जनजागृती पूर्णम इकोव्हिजन, पर्यावरण संरक्षण गतिविधीचे अभियान

जनजागृती पूर्णम इकोव्हिजन, पर्यावरण संरक्षण गतिविधीचे अभियान


जनजागृती
सहा ठिकाणी कायमची इ-कचरा संकलन केंद्रे; आता वर्षभर मोहीम लॅपटॉप, कॉम्प्युटर, फ्रीज, टीव्ही जमा करणार

पूर्णम इकोव्हिजन फाउंडेशन आणि पर्यावरण संरक्षण गतिविधी यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात तीन वर्षांपासून इ-कचरा जनजागृती आणि संकलन मोहीम राबविण्यात येत आहे. इ-कचरा संकलन वर्षातून एकदाच केले जात होते. मात्र, नागरिकांचा प्रतिसाद आणि मागणी पाहता संस्थेतर्फे आता वर्षभर इ-कचरा संकलन करण्यात येणार आहे. त्यासाठी सहा ठिकाणी कायमस्वरूपी संकलन केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. त्यामुळे दर महिन्याला वेगवेगळ्या भागांत विशेष मोहीम राबवून इ-कचरा संकलित करता येईल.
पूर्णम इकोव्हिजन फाउंडेशन आणि पर्यावरण संरक्षण गतिविधीद्वारे या वर्षी २६ जानेवारीला झालेल्या विशेष मोहिमेत लॅपटॉप, कॉम्प्युटर, फ्रीज, टीव्ही, कूलर अशा वस्तूंचा ४.५ टन इ-कचरा संकलित केला होता. या सर्व वस्तू दान स्वरूपात स्वीकारल्या जातात आणि त्या दुरुस्त करून गरजू विद्यार्थी, शाळा, महाविद्यालये, संस्था, संघटनांना दिल्या जातात. रविवारी (दि. २०) विल्होळी, पाथर्डी फाटा, इंदिरानगर, बोधलेनगर, काठे गल्ली या परिसरात ही मोहीम राबविण्यात येईल. अधिक दिल्या जातात. रविवारी (दि. २०) विल्होळी, पाथर्डी फाटा, इंदिरानगर, बोधलेनगर, काठे गल्ली या परिसरात ही मोहीम राबविण्यात येईल. अधिक माहितीसाठी वैभव फेंडर (8421991144) आणि शत्रुघ्न रणसुभे (9960663802) यांच्याशी संपर्क साधता येईल.

 

शहरात २० ठिकाणी तात्पुरते केंद्र, गरजूंना देणार

काही वर्षांपासून इ-वेस्टची समस्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे शहरात इ-कचरा संकलनासाठी सहा ठिकाणी कायमस्वरूपी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. याबरोबरच २० ठिकाणी तात्पुरते केंद्र आहे. संकलित क्स्तू दुरुस्त करून गरजू विद्याथ्यर्थ्यांना मदत म्हणून दिली जातील. - वैभव फेंडर, शहर संयोजक, पूर्णम इकोव्हिजन फाउंडेशन

 

 

ही सहा संकलन केंद्रे


१) हिमाचल सोसायटी, आरटीओ कॉलनीजवळ, बोधलेनगर लक्ष्मण गाडगीळ (9067563385)

२) लोकेशएनर्जी, शॉपनं. ३, अल मस्कन सोसायटी, माणेकशॉनगर : नितीन पाठक (9370331163) 

३) शॉप नं. ४, संदेश संकुल सोसायटी, नामको बँकेशेजारी, इंदिरानगर: प्रफुल्ल काजळे (9850120763) 

४) श्री गुरुजी रुग्णालय नाशिक, बाल रुग्णालय विभाग, विल्होळी: मनोह भावनाथ (9850614660) 

५) कमल विनायक अपार्टमेंट, दुसरा मजला, नाशिक टायरच्या मागे, गंगापूररोड : महेश दीक्षित (9850883890)

 ६) वसंतउषा, ७५/७६ डी, गणेशनगर, पाइपलाइनरोड, सातपूर : कौस्तुभ मसूरकर (9763511629)